24.5 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home विदर्भ राजकीय पक्ष ओबीसी पदाधिकाèयांचे समन्वयकपदी माजी खा.डॉ.खुशाल बोपचे

राजकीय पक्ष ओबीसी पदाधिकाèयांचे समन्वयकपदी माजी खा.डॉ.खुशाल बोपचे

0
23

berartimes.com गोंदिया,दि.25- गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने २४ सप्टेंबरला मयुर लॉन येथे आयोजित बैठकित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ८ डिसेंबरच्या ओबीसी महामोच्र्याला यशस्वी करण्यासाठी विविध पक्षातील ओबीसी नेते,पदाधिकारी यांच्याशी समनव्य ठेवण्यासाठी माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांची राजकीय पक्ष ओबीसी पदाधिकाèयांच्या समनव्य समितीचे प्रमुख म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य बबनराव तायडावे व निमंत्रक सचिन राजूरकर यांनी नावाची घोषणा केली.त्यांच्या नावाची सुचना सामाजिक कार्यकर्ते जिवन लंजे यांनी केली होती.माजी मंत्री भरतभाऊ बहेकार,माजी.जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ.झामसिंह बघेले,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,जीडीसी बँकेचे संचालक प्रमोद लांजेवार ,रेखलाल टेंभरे,गोपाल तिराले,दुर्गाताई तिराले,महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष धन्नालाल नागरिकर तसेच शेकापचे जिल्हा सयोजंक चनीराम मेश्राम यांनीही डॉ.बोपचे यांनी समन्वयकाची भूमिका स्विकारत ओबीसी महामोर्चा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,कार्याध्यक्ष अमर वराडे,कैलाश भेलावे,राजेश नागरीकर,सविता बेदरकर,मोहिनी निंबार्ते,खेमेंद्र कटरे यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.