24.5 C
Gondiā
Wednesday, August 26, 2026
Home विदर्भ गोंदिया शहर ओबीसी संघर्ष कृती समिती अध्यक्षपदी विष्णु नागरीकर

गोंदिया शहर ओबीसी संघर्ष कृती समिती अध्यक्षपदी विष्णु नागरीकर

0
29

गोंदिया,-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने २४ सप्टेंबरला मयुर लॉन येथे आयोजित ओबीसी संघर्ष कृती समितीच्या जिल्हा बैठकित गोंदिया शहर ओबीसी संघर्ष कृती समिती व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षपदी नगरसेवक विष्णु नागरीकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.नागरीकर हे ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी असून गोंदिया शहरात संघटनेचे जाळे बळकट करण्याच्या उद्देशाने त्यांच्या नावाची घोषणा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोजंक प्राचार्य बबनराव तायवाडे व ओबीसी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी केली.नागरीकर यांच्या निवडीचे बैठकिला उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी व समाजबांधवानी अभिनंदन केले आहे.