तिरोडा,दि.१६ःतालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या अपार आयडी व आधार व्हॅलिटेशन झाले नाही तर विद्यार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू शकतात.त्यामुळे कोणताही विद्यार्थी हा शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये असे आवाहन गटशिक्षणाधिकारी अरुण गिरेपुंजे यांनी केले.ते पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केंद्रप्रमुख , विस्तार अधिकारी व मुख्याध्यापकांच्या सभेत बोलत होते.यावेळी अपर आयडी आधार व्हॅलिडेशन प्रलबिंत असलेला शाळांच्या मुख्याध्यापकांना शंभर टक्के काम पुर्ण व्हायला पाहिजे असे निर्देश देण्यात आले.याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बरयीकर यांनीही मार्गदर्शन केले.संचालन शिक्षण विस्तार अधिकारी जियालाल अंबुले व आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी डी बी साकोरे यांनी मानले.





