29.8 C
Gondiā
Wednesday, September 16, 2026
Home शैक्षणिक सुट्ट्यांच्या नियोजनार्थ सहविचार सभा

सुट्ट्यांच्या नियोजनार्थ सहविचार सभा

0
35

तिरोडा : गोंदिया जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात २०२६ च्या सुट्यांच्या नियोजनार्थ मान्यताप्राप्त संघटनांच्या प्रतिनिधींसोबत प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांच्यासोबत सहविचार सभा पार पडली. यावेळी २०२६ च्या सुट्ट्यांचे नियोजन सर्वसंमतीने करण्यात आले.
या सहविचार सभेला मुख्याध्यापक संघाचे विदर्भसंघटन सचिव प्राचार्य डी आर गिरीपुंजे, महाराष्ट्र राज्य शिक्षक
परिषदेचे जिल्हाध्यक्ष आतिश ढाले, कार्यवाह गजानन चंदीवाले, वीमाशिचे जिल्हा संघटक सी.एन.चौधरी, संदीप मांढरे, अध्यक्ष राज्य पुरस्कार शिक्षक संघ घनश्याम पटले, विजुक्ताचे जिल्हाध्यक्ष पोमेंद्रकुमार कटरे,जे.आर.भेंडारकर,ए.ए. बॅनर्जी, सचिव जी.एम.खान,अध्यक्ष मुख्याध्यापक परदेशी,एम.एम.बघेले प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते एका पुस्तकाचे विमोचन सुद्धा करण्यात आले. यावेळी उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे शिक्षण विभागाचे अधीक्षक भगत उपस्थित होते.