29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ सिकलसेल जनजागृती आणि वेळेत निदान उपचार हिच काळाची गरज-आमदार रामदास मसराम

सिकलसेल जनजागृती आणि वेळेत निदान उपचार हिच काळाची गरज-आमदार रामदास मसराम

0
40

अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानांचे देसाईगंज तालुक्यात शुभारंभ

देसाईगंज दि.१६-गडचिरोली जिल्हयाला ग्रासलेल्या सिकलसेल ॲनिमीया विळख्यातुन मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागतर्फ अरुणोदय या विशेष अभियान दिनांक १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राबविले जाणार आहे.त्याअनुषंगाने देसाईगंज तालुक्यातात सदर अभियानाचा शुभारंभ आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम सर यांच्या शुभ हस्ते ग्रामिण रुग्णालय, देसाईगंज येथे नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद देसाईगंजच्या नगराध्यक्ष लताताई मुर्लीधर सुंदरकर हे होते तर प्रमुख मान्यवर म्हणुन नगरपरिषद देसाईगंज चे उपाध्यक्ष नरेश विठलानी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद ठिकरे, ग्रामिण रुग्णालय चे वैद्यकिय अधिकक्ष डॉ. अविनाश मिसार, वैद्यकिय अधिकारी डॉ. इकबाल बेग, डॉ. राहुल राऊत, डॉ. मृणाली, डॉ. प्रणय कोसे, सामाजीक कार्यकर्त धनपालजी मिसार, मर्लीधरजी सुंदरकर उपस्थित होते.
सिकलसेल ही तालुक्यासाठी चिंतेची बाब असुन केवळ औषधोपचार यावर उपाय नाही तर जनजागृती आणि वेळेत निदान हिच काळाची गरज आहे. या विशेष मोहिमव्दारे तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहचविण्याचा प्रयत्न आरोग्य विभागानी करावे व सर्व नागरिकानी घरोघरी येणा-या आरोग्य कर्मचारी व आशा यांना सहकार्य करावे असे आपल्या उदघाटनीय भाषनातुन आमदार रामदासजी मसराम यांनी विशद केले.
सिकलसेल आजारानी कुणी ग्रस्त असेल त्याना विवाह पूर्व व विवाह पश्चात समुपदेशन करणे, जे सिकलसेल आहेत त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र व सरकारच्या योजना विषयी सल्ला देणे. विवाह पूर्व व पश्चात सिकलसेल चाचणी करणे साठी सल्ला देणे ईत्यादी माहिती आपल्या प्रास्ताविक मधुन तालुका आरोग्य अधिकारी, देसाईगंज डॉ. आनंद ठिकरे यांनी सांगीतली दिनांक १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान जवळच्या सर्व आरोग्य च्या केंद्रावर सिकलसेलची मोफत तपासणी केली जाणार आहे. निदान झालेल्या रुग्णानां तात्काळ तज्ञाचे मार्गदर्शन आणि औषधोपचार पुरवले जातील.
कार्यकमाचे सुत्रसंचालन एनसीडी समुपदेशक तारकेश्वरी कांबळी तर आभार पॅरा मेडिकल वर्कर दिनकर संदोकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामिण रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

blank