गोंदिया :तिरोडा नगर परिषदेच्या उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडीची सभा आज(दि.१६)नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक असाटी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यात उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेश गुणेरिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच स्विकृत सदस्यामध्ये राष्ट्रवादी काँगेसकडून अजय गौर व भारतीय जनता पार्टीकडून संजयसिंह बैस यांची यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





