24.3 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home राजकीय सोलापुरमध्ये हत्या प्रकरणातील भाजप उमेदवाराचा विजय

सोलापुरमध्ये हत्या प्रकरणातील भाजप उमेदवाराचा विजय

0
21
सत्ता आणि पैशांच्या जोरावर ही निवडणूक लढली
मनसे लोकसभा प्रमुखाचा भाजपावर आरोप
सोलापुर/वृत्तसेवा-सोलापुरमध्ये हत्या प्रकरणातील, भाजप उमेदवाराचा विजय झाला आहे, तर सत्ता आणि पैशांच्या जोरावर ही निवडणूक लढली आहे, असा सोलापुरमधील मनसेचे लोकसभा प्रमुखानी भाजपावर आरोप केला आहे. सोलापुरात मनसे पदाधिकारी हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या भाजप उमेदवाराचा विजय झाल्यामूळे, येथे मनसेचे युवा नेते बाळासाहेब सरवदे यांच्या हत्याप्रकरणाचा कुठलाही भावनिक परिणान झाला नसल्याचे दिसून येते. सोलापुरात मनसे मनसे पदाधिकारी हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या भाजप उमेदवार शालन शिंदे यांचा विजय झाला आहे.
भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रभाग 2 मध्ये सर्वांचे लक्ष लागले होते. येथून किरण देशमुख यांच्याविरुद्ध शिवसेनेचे गणेश कुलकर्णी यांच्यात थेट लढत होती. विशेष म्हणजे याच प्रभागातील प्रभाग 2 क मधील भाजप उमेदवार शालन शिंदे अटकेत असून येथील प्रभागातच मनसेच्या बाळासाहेब सरवदे यांचा खून झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे, प्रभाग 2 मधील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापुरातील प्रभाग 2 मध्ये भाजपचे 4 ही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे, येथे हत्याप्रकरणाचा कुठलाही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले.
सोलापुरात मनसे पदाधिकारी हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या भाजप उमेदवाराच्या विजयाने मनसेने नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यात लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची हत्या आहे. मुळात येथे खून झालेलाच होता, उमेदवार पहिल्या दिवसापासून तुरुंगात आहे. तरीही पहिल्या फेरीपासून लीडवर आहे, 4 हजारांच्या फरकाने उमेदवार निवडून येतो. सत्ता आणि पैशांच्या जोरावर ही निवडणूक लढली गेली आहे, असा आरोप सोलापुर मनसेचे लोकसभा प्रमुख प्रशांत इंगळे यांनी केला आहे. या राज्यात एखाद्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतर, देखील तुरुंगात राहणारा उमेदवार, विजयी होत असेल तर, समाजाने मतदार म्हणून आपण याचा विचार करावा, अशी नाराजीची प्रतिक्रिया सोलापुरातील मनसेचे लोकसभा प्रमुख प्रशांत इंगळे यांनी दिली आहे. सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग 2 क मध्ये भाजप उमेदवार शालन शिंदे यांच्या विजयानंतर मनसे पदाधिकारी नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे.

blank