23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ मुल्ला येथे डाक चौपालचे यशस्वी आयोजन

मुल्ला येथे डाक चौपालचे यशस्वी आयोजन

0
122

देवरी,दि.१८- देवरी तालुक्यातील मुल्ला येथे काल शनिवारी (दि.१७) भारतीय टपाल खात्यामार्फत डाक चौपाल कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

मुल्ला येथील ग्राम पंचायतीच्या भवनात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुल्लाच्या सरपंच कल्पना बागडे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या पोलिस  पाटील ललिता भुते, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पुष्पलता बागडे, डाक विभागाचे मेव ओव्हरसिअर जी एक कोसरकर, सीताराम मेंढे, गुणीदास वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन मुल्लाच्या पोस्टमास्तर सीमा साळुंके यांनी केले. यावेळी बेसिक अकाऊंटचे १२ खाती उघडण्यात आली.

blank