23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ वडेगाव येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे थाटात लोकर्पण

वडेगाव येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे थाटात लोकर्पण

0
99

देवरी, (दि. १८) : तालुक्यातील ग्राम वडेगांव येथे काल शनिवारी (दि.१७) नवीन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण मोठ्या थाटात पार पडले.

या लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर हे होते. या नवीन वास्तूचे लोकार्पण आमदार संजय पुराम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अंजू बिसेन, देवरी पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन, गोंदिया जिल्हा परिषदेच्या सभापती सविता पुराम, गोटाबोडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य कल्पना वालोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष सरपंच अंजु बिसेन यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, गट-तटाचे राजकारण न करता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आले. गावात अगोदर पाणी टंचाईची समस्या निर्माण होती आज सर्व हातपंपावर सोलर पंप बसवून गावाला पाणीटंचाई मुक्त केले. ही नवी इमारत ग्रामस्थांच्या सेवेसाठी अधिक सक्षम, सुसज्ज आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यक्रमाला उपसरपंच भोजराज पंधरे,सदस्य अशोक वाणी , विजय भोयर, सुषमा करचाल, रंजना नेवारे, जशोदा वाढिवे,हंसराज टेंभरे,पालिका राऊत आणि  गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank