
उद्या सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरणार;
जि.प.साठी भाजप ३१ तर शिवसेना १९ जागा; तर पंचायत समितीसाठी भाजप ६३ आणि शिवसेना ३७ जागा लढणार;
जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचाही फॉर्मुला निश्चित झाला आहे.यात तीन वर्ष भाजप आणि दोन वर्ष शिवसेना
सिंधुदुर्ग:-सिंधुदुर्ग जिल्हा परिषद साठी शिवसेना-भाजप युतीचा जागावाटप फॉर्म्युला खासदार नारायण राणे यांनी आज जाहीर केला. यात जिल्हा परिषदेसाठी एकूण ५० जागांपैकी भाजप ३१ आणि शिवसेना १९ जागा लढणार आहे. तर पंचायत समितीच्या १०० जागांपैकी भाजप ६३ आणि शिवसेना ३७ जागा लढणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटालाही काही जागा दिल्या जाणार आहेत. त्याबाबत लवकरच निर्णय होईल. उद्या सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होतील अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी आज दिली.कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी श्री. राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, कोणताही वाद न होता युतीचे जागा वाटप झाले आहे.





