मुंबई:-भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज के. पुरोहित यांचे काल रात्री मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे मुंबईतील भाजपचा एक आक्रमक आणि अभ्यासू चेहरा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.




