गोरेगाव,दि.१८ः जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणने राज्यात व देशातील काही भागात जीवनदान महाकुंभ 2026 हे रक्तदान शिबिराचे अभियान सुरु असून 4 जानेवारी ते 17 जानेवारी पर्यंत 122454 रक्तपिशव्या संकलित झाले आहे. हे महानकार्य जाती -धर्माच्या पलीकडे असून प्रत्यक्ष कृतीतून साकारत आज 18 जानेवारी शेवटच्या दिवशी सर्वाधिक नोंदीत भर होईल.
हे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे मानवसेवेचे कार्य सर्वाधिक प्रेरणादायी आहे, असे मत गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पिपलेवार यांनी रक्तदान शिबीराची सुरवात करताना व्यक्त केले.यावेळी नगराध्यक्ष तेजराम बिसेन, डॉ ठाकरे, जिल्हाध्यक्ष मुलचंद खांडवाये,गिरधारी जमाइवार,येळे, तालुकाध्यक्ष मुन्नीलाल नाईक, महिलाध्यक्ष रंजना आंबेडारे, पूजा कटकवार, युवाध्यक्ष कैलास खिरेकर, देणगी प्रमुख पंकज खांडवाये, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय चन्ने उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यात 17 शिबिराच्या माध्यमातून हजारो रक्तपिशव्या शासनाला रामानंदाचार्य संप्रदाय कडून थ्यालेशिमीयाग्रस्त, ब्लड कॅन्सरग्रस्त, शिकलसेल, अपघातग्रस्त, प्रसूती दरम्यान अशा रुग्णांच्या सेवेसाठी हे अभियान राबविले जाते अशी माहिती जिल्हाध्यक्ष मुलचंद खांडवाये यांनी दिली.





