26.9 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ भंडारा नगरपरिषदेची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई

भंडारा नगरपरिषदेची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई

0
77
बस स्थानक ते गांधी चौक परिसर मोकळा करण्यास सुरुवात
भंडारा-भंडारा नगरपरिषदेच्या वतीने शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व सार्वजनिक रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने बस स्थानक ते गांधी चौक या मुख्य मार्गावर आजपासून अतिक्रमण हटाव कारवाई सुरू करण्यात आली आहे.या कारवाईत रस्त्यावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले हातगाडे, टपऱ्या, फलक तसेच दुकानांसमोरील अडथळे हटविण्यात आले. अतिक्रमणामुळे या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असून पादचाऱ्यांना चालणेही अवघड होत होते.नगरपरिषद प्रशासनाने यापूर्वी संबंधित व्यावसायिकांना सूचना व नोटिसा दिल्या होत्या. त्यानंतरही अतिक्रमण कायम असल्याने आज प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात होता.नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले की, शहरातील इतर भागातही टप्प्याटप्प्याने अशीच अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

blank