28.3 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home गुन्हेवार्ता बीएएमएसमध्ये प्रवेशाचे आमिष, पाच लाखांनी केली फसवणूक

बीएएमएसमध्ये प्रवेशाचे आमिष, पाच लाखांनी केली फसवणूक

0
126

गोंदिया : वैद्यकीय शिक्षणासाठी बीएएमएस कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तिरोडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम चांदोरी खुर्द येथे २३ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर २०२४ दरम्यान हा प्रकार घडला आहे.
हरिचंद मोडकू वैद्य (वय ५०, रा. चांदोरी खुर्द) यांनी तिरोडा पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलाला उत्तराखंड राज्यातील मंजिरादेवी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, उत्तरकाशी येथे बीएएमएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून आरोपी फागुलाल शिवाजी भगत (५३) व आशिष फागुलाल भगत (२४, दोघे रा. बाघोली, सध्या पारसनगरी, तिरोडा) या बापलेकांनी आमिष देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी टप्प्याटप्प्याने फोन-पेच्या
माध्यमातून एकूण पाच लाख रुपये हरिचंद यांच्याकडून घेतले. मात्र, दीर्घ कालावधी उलटूनही त्यांच्या मुलाचा कॉलेजमध्ये प्रवेश न झाल्याने तसेच पैसे परत मागितल्यावर उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी हरिचंद वैद्य यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३ (५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक कवडे करीत आहेत.
सहा वेळा झाले ऑनलाइन ट्रान्जेक्शन
आरोपी आशिष भगत याच्या बँक खात्यात टप्प्याटप्याने सहा वेळा एकूण पाच लाख रुपये टाकण्यात आले आहे. यामध्ये, २३ ऑगस्ट २०२४ रोजी एकवेळा ५० हजार व दुसऱ्यांदा ५० हजार रुपये, २९ ऑगस्ट २०२४ रोजी एक लाख रुपये, ३ सप्टेंबर २०२४ रोजी एक लाख रुपये, ९ सप्टेंबर २०२४ रोजी एक लाख रुपये तसेच १८ सप्टेंबर २०२४ रोजी एक लाख रुपये असे एकूण पाच लाख रुपये आशिष भगत याच्या बैंक खात्यात टाकण्यात आले आहेत.
प्राचार्याशी संपर्क साधल्यावर फुटले बिंग
काही दिवसांनी मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला असल्याचे सांगून आशिष भगत याने विश्वास निर्माण केला. मात्र प्रत्यक्षात मुलाला प्रवेश मिळाला नसल्याचे कळल्यावर हरिचंद वैद्य यांनी कॉलेज प्राचार्याशी संपर्क साधला आणि प्रवेश झालेला नाही, असा निष्कर्ष समोर आला. मुलाचे एक वर्ष वाया गेले, तरीही आशिष भगत आणि फागुलाल भगत यांनी पैसे परत देण्यास नकार दिला

blank