23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home गुन्हेवार्ता नागपूर ग्रामीण पोलीस अन्टी-ड्रग्ज स्क्वॉडचा कन्हानमध्ये मोठा सर्जिकल स्ट्राइक

नागपूर ग्रामीण पोलीस अन्टी-ड्रग्ज स्क्वॉडचा कन्हानमध्ये मोठा सर्जिकल स्ट्राइक

0
4

; ‘फायटर ड्रग्ज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रामाडोल गोळ्यांचा साठा जप्त!

  • लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपी शोएब अन्सारी पोलीस कोठडीत

  • ६६ बॉक्समध्ये तब्बल १५,८१४ एनडीपीएस गोळ्या आणि चारचाकी वाहन जप्त

कन्हान/नागपूर:नागपूर ग्रामीणच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत बेकायदेशीर नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘फायटर ड्रग्ज’ (Fighter Drug) म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या ‘Tramadol HCL’ (Pyeevon Spas Plus) या अमली टॅब्लेटचा सुमारे ३ लाख ६३ हजार २० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. २१ जुलै रोजी करण्यात आलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे ड्रग्ज माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे घराभोवती सापळा

अंमली पदार्थ विरोधी पथक कन्हान उपविभागात गस्त घालत असताना, कांद्री येथील कॉलनी नंबर ३ मध्ये राहणारा शोएब जब्बर अन्सारी (वय ४० वर्षे) हा कोणत्याही वैध परवान्याशिवाय स्वतःच्या घरातून नशेच्या गोळ्यांची किरकोळ विक्री करत असल्याची गुप्त माहिती खबर्याकडून मिळाली. माहितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पोलिसांनी तात्काळ त्याच्या राहत्या घरावर छापा टाकला.

३.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी घेतलेल्या झडतीत आरोपीच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:Pyeevon Spas Plus (Tramadol HCl) टॅब्लेट: ६६ बॉक्स (तब्बल १५,८१४ गोळ्या, वजन ७.९०७ किलोग्रॅम)रोख रक्कम व इतर वस्तू: २ मोबाईल हँडसेट, रोख रक्कम आणि १ चारचाकी वाहन.

‘फायटर ड्रग्ज’चे घातक दुष्परिणाम

‘ट्रामाडोल’ हे खरंतर तीव्र वेदनाशामक (Prescription Opioid) औषध आहे. मात्र, नशा मिळवण्यासाठी आणि उत्तेजक म्हणून याचा गैरवापर केला जातो. या औषधाच्या अतिसेवनाने मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होऊन श्वासोच्छवासाचा त्रास, झटके येणे आणि मृत्यू ओढवण्याचा मोठा धोका असतो.याप्रकरणी आरोपीविरोधात कन्हान पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या कलम ८ (क) आणि २२ (सी) अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे ड्रग्ज कुठून आणले आणि कोणाला विकले जाणार होते, याचा मुळापासून शोध घेतला जात आहे.

पोलीस पथकाची कामगिरी

ही यशस्वी कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि कन्हानचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गायकवाड यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली.कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि अजितसिंग देवरे, पोनि वैजयंती मांडवधरे, पोउपनि प्रवीण भिमटे, पोहवा प्रवीण देव्हारे, प्रकाश ठोके, अमोल नागरे, अनिल खरडकेले आणि पोशि अविनाश तोडसाम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

blank