32.5 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ चोरखमारा तलाव परिसरात पाणपक्षी निरिक्षण

चोरखमारा तलाव परिसरात पाणपक्षी निरिक्षण

0
30

तिरोडा,दि.२२ः सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तिरोडा यांच्यामार्फत Asian Water Birds Census 2026 अंतर्गत दिनांक 17 जानेवारी रोजी चोरखमारा तलाव परिसर येथे पाणपक्षी निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.सदर कार्यक्रमामध्ये पक्षीतज्ञ विवेक पटले, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगावचे प्राचार्य एस.पी.ठाकरे तसेच इतर अध्यापकवर्ग सहभागी झाले होते. याशिवाय सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तिरोडाचे एम.आर.येटरे,पी.एफ.डहाट,एच. जी. पटले,जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडेगावचे सुमारे ५० विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. निरीक्षणादरम्यान चोरखमारा तलाव परिसरात देसी तसेच स्थलांतरित पाणपक्ष्यांचे विविध प्रकार आढळून आले.
निरीक्षणादरम्यान Northern Pintail, Garganey, Spot-billed Duck, Cotton Pygmy Goose, Little Cormorant, Great Cormorant, Honey Buzzard, Black Eagle, Swallows, Egret, Heron, Red Crested Pochard, Common Pochard, Shikra, Pintail, Hawk पक्ष्यांची नोंद करण्यात आली.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पक्षीसंवर्धन, जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली.

blank