26.9 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत चित्ररथाचे आदिवासी विकास मंत्री डॉ. उईकेच्या हस्ते हिरवी झेंडी...

अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत चित्ररथाचे आदिवासी विकास मंत्री डॉ. उईकेच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन

0
35

*जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम*

गोंदिया, दि.22 : शासन राबवित असलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती जिल्ह्यातील नागरिकांना अवगत व्हावी, यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांवर आधारित जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘संकल्प विकसित महाराष्ट्राचा’ चित्ररथाचे आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले.

         यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार संजय पुराम, जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर, समाज कल्याण निरीक्षक स्वाती कापसे यांचेसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

         या चित्ररथावर अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचतगटांना मिनी टॅक्ट्रर व उपसाधनांचा पुरवठा करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मुलामुलींसाठी निवासी शाळा, मासेमारी साधनावर अर्थसहाय्य योजना, मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृहे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आदी योजनांचा समावेश आहे. एकूण चार चित्ररथ जिल्हाभर फिरणार आहेत.

         तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या चित्ररथाच्या माध्यमातून अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती अवगत करुन सदर योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर व जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर यांनी केले आहे.

blank