गोंदिया ः शहरात २० जानेवारी रोजी रात्रीला सिंधी समाजातील एका मुलीसोबत गैरवर्तन करण्यात आले. या घटनेचा निषेध करीत सिंधी जनरल पंचायत गोंदियाने पोलिस अधीक्षकांच्या नावे उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांना गुरुवारी (ता. २२) निवेदन दिले. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या घटनेने महिलांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चाैकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त पोलिस तैनात करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांना निवेदन देताना सिंधी जनरल पंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.





