25.3 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ विभागीय संचालक कुष्ठरोग डॉ.प्रनील कांबळे यांची जिल्ह्यातील आरोग्य संस्थाना भेटी

विभागीय संचालक कुष्ठरोग डॉ.प्रनील कांबळे यांची जिल्ह्यातील आरोग्य संस्थाना भेटी

0
64

गोंदिया-कुष्ठरोगाचे प्रमाण दर दहा हजारी लोकसंख्येमागे दोन पेक्षा जास्त असेलतर अशा राज्यातील आरोग्य संस्थाना भेटी देवुन त्यामागील कारणे व तेथे करण्यात येणार्या प्रतिबंधात्म्क उपाययोजनासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रमाचे महानिर्देशक यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विभागीय संचालक कुष्ठरोगयांचा राज्यनिहाय भेटी कार्यक्रम आखण्यात आला. जिल्ह्याचा कुष्ठरोग पी.आर.निर्देशांक 2.98 असा आहे.त्याअनुषंगाने पुणे येथील कुष्ठरोग विभागाचे विभागीय संचालक डॉ.प्रनील कांबळे यांनी दि. 8 व 9 जानेवारीला विविध आरोग्य संस्थाना भेटी देवुन जिल्ह्यात होत असलेल्या कुष्ठरोग कामाची पाहणी केली.

8 जानेवारी रोजी गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा,ग्रामीण रुग्णालय गोरेगाव तर 9 जानेवारी रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोरंभीटोला,ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव व आरोग्यवर्धीनी उपकेंद्र कुंभीटोला येथे भेट देवुन कुष्ठरोग कामाची केली पाहणी.भेटी दरम्यान आरोग्य संस्थेतील वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी,आशा सेविका व कुष्ठरोग बाधित रुग्णांची सुद्धा संवाद साधला. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमचा दप्तर तपासणी करण्यात आली व उपचाराखालील उपचारमुक्त रुग्णाची मुलाखत घेण्यात आली.तसेच तालुक्यातील कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र येथे भेट देवुन करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहीती घेतली.

भेटी अनुशंगाने डॉ.प्रनील कांबळे यांनी यावेळी कुष्ठरोगाचे सक्रिय संक्रमण,उच्च-प्रमाण असलेल्या भागात विशेष शोध मोहीम राबवली जाते.कुष्ठरोग्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व आसपासच्या सदस्यांना प्रतिबंधात्मक उपचारांचा भाग म्हणून सिंगल डोस रिफॅम्पिसिन दिला जातोज्यामुळे कुष्ठरोग होण्याचा धोका कमी होतो. रुग्णांची नोंदणी आणि देखरेख करण्यासाठी डिजिटल पोर्टलचा वापर केला जातो. सामाजिक कलंक आणि गैरसमज कुष्ठरोगाविषयी भीती आणि कलंक असल्यामुळेलोक सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि लपवून ठेवतात. यामुळे तपासणीसाठी समोर येत नाहीत. अशा विविध बाबीवर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.भेटी दरम्यान त्यांचे सोबत सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.महेंद्र धनविजय,नोडल अधिकारी डॉ.भाग्यश्री गावंडे,फिजिओथेरपीस्ट डॉ.घनश्याम समरीत,अवैद्यकीय सहाय्यक संतोष बोरकर,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी,आशा सेविका उपस्थित होते.

blank