24.6 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home महाराष्ट्र भुजबळ समर्थकांचा विराट मोर्चा निघणार

भुजबळ समर्थकांचा विराट मोर्चा निघणार

0
27

berartimes.com नाशिक दि.२७ : संपूर्ण देशात मागासवर्गीय व बहुजन समाजाच्या न्याय हक्कांची जाणीव करून देणारे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ दिनांक ३ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे निघणारा विराट मोर्चा लक्ष्मीनारायण मंदिर तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे जाणार असून या मोर्च्याचा समारोप जिल्हापरिषद मैदान येथे होणार आहे.

सदर मोर्चाला लक्ष्मीनारायण मंदिर,तपोवन येथून सुरवात होणार असून चव्हाण मळा,आठवण लॉन्स मार्गे तपोवन कॉर्नर,आईस फॅक्टरी ,काट्या मारुती मंदीर,जुना आडगाव नाका,निमाणी बस स्थानक,पंचवटी कारंजा,मालेगाव बस स्थानक ,रविवार कारंजा,रेडक्रॉस सिग्नल,एम.जी. रोड ,मेहेर सिग्नल,जिल्हा अधिकारी कार्यालय असा असून जिल्हा परीषद मैदान येथे सदर मोर्च्याचा समारोप होणार आहे. या मोर्च्यानंतर स्वयंसेवक संपूर्ण मार्गाची स्वच्छता करणार आहेत.