
अर्जुनी-मोर.–जिल्हा वार्षिक योजना जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत ग्रामपंचायत सोमलपूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचा लोकार्पण सोहळा दि. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
लोकार्पण प्रसंगी बोलताना रचनाताई गहाणे म्हणाल्या की, “अंगणवाडी ही केवळ इमारत नसून, बालकांच्या शारीरिक, बौद्धिक व नैतिक विकासाची पहिली पायरी आहे. ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार पोषण, शिक्षण आणि संस्कार देण्यासाठी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे.” भविष्यातही सोमलपूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सदस्या पुष्पलताताई दृगकर, सरपंच भुमिकाताई ढोक, उपसरपंच उल्हास लेंडे, ग्रामपंचायत सदस्य रेखाबाई झोळे, रुपलताताई हातझाडे, प्रितीकाताई कानेकर (मा.), पोलीस पाटील तुळशिराम बोरकर, पोलीस पाटील तुषार कापगते, माजी सरपंच लिलेश्वर खुणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदु कापगते, अंगणवाडी सेविका राजगीरे, माजी सरपंच आशाबाई हातझाडे, ग्रामपंचायत अधिकारी सोनवाने, जैराम हातझाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला भगिनी व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व आनंददायी होते.





