27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ वनसंवर्धन व संरक्षण कार्यात उत्कृष्ठ कार्याबद्दल नवाटोला वनव्यवस्थापन समितीचा गौरव

वनसंवर्धन व संरक्षण कार्यात उत्कृष्ठ कार्याबद्दल नवाटोला वनव्यवस्थापन समितीचा गौरव

0
78

सालेकसा,दि.२७ः सालेकसा वनपरिक्षेत्रातील वन व्यवस्थापन समिती नवाटोलास वनव्यवस्थापनासह वनसंरक्षण व संवर्धन कार्यात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल २६ जानेवारीला ७७ व्या प्रजासत्ताकदिनी सालेकसा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. नवाटोला वनपरिसरात ५ जानेवारी २०२६ रोजी छत्तीसगड येथील लाकुड तस्कर सागवान लाकडाची कापणी करुन बिट क्रमांक ८१८मधून वाहतूक करीत असतांना वनव्यवस्थापन समितीच्या जागृत सदस्यानी गुप्त माहितीच्या आधारे धाड घालून ५ वनतस्करांना वनविभागाच्या स्वाधिन केले होते.त्यांनी केलेल्या या कार्याची दखल गोंदिया वनविभागाचे उपवनसरंक्षक पवनकुमार जोंग,सहाय्यक वनसरंक्षक सचिन डोंंगरवार यांनी घेत त्यांच्या या कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्याचा निर्णय घेतला.त्या अनुषंंगाने २६ जानेवारीला सालेकसा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश घुंटके यांच्याहस्ते नवाटोला वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यासह नवाटोला क्षेत्र सहाय्यक बी.ए.कोहरे,क्षेत्र सहाय्यक एस.वाय.चव्हाण,वनरक्षक एस.के.बागडे,गणेश पाऊलझगडे,किशोर फुंडे,विनोद भेंडारकर,सुरेश पटले, व प्रदिप भांडारकर यांना प्रशस्तीपत्र देत गौरवण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता क्षेत्रसहाय्यक एस.एम.पवार,जे.जी. खान,से.स.बनोठें,तुरकर व इतर कर्मचा-यांनी सहकार्य केले.