30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

0
43

अर्जुनी मोरगाव :- गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री इंद्रणिल नाईक यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले तसेच गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर,महिला व बालकल्याण सभापती पोर्णिमाताई ढेंगे,पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार, नगराध्यक्ष मंजुषाताई बारसागडे,अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला,उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे,तहसिलदार अनिरुद्ध कांबळे,गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर,व अन्य गणमान्य नागरिक उपस्थित होते.
अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयाची विद्यमान इमारत गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होती. या पार्श्वभूमीवर आमदार राजकुमार बडोले यांनी महसूल विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार नवीन इमारतीच्या बांधकामास मंजुरी मिळाल्यानंतर भूमिपूजन करून कामास अधिकृत सुरुवात करण्यात आली.नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीमुळे तालुक्यातील नागरिकांना महसूल विषयक कामांसाठी अधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील, तसेच प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास पालकमंत्री इंद्रणिल नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाला प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.