24.8 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home राजकीय सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड; राज्यसभा खासदारकीचा राजीनामा

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड; राज्यसभा खासदारकीचा राजीनामा

0
26

आता सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी आज सायंकाळी 5 वाजता होणार

मुंबई:-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी ५ वाजता त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. सुनेत्रा पवार यांची आज सर्वप्रथम पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. आज दुपारी २ च्या सुमारास विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पार पडली. यात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली. यावेळी पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

blank