अकोला : सामाजिक संघटनांचे कार्यक्रम म्हणजे राजकीय भाषणे व गटबाजी असा समज असताना, धनगर अधिकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, अकोला जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित ५ वा वर्धापन दिन व हळदी-कुंकू समारंभाने हा समज पूर्णतः खोडून काढला. नुकताच अण्णासाहेब रोकडे सभागृहात पार पडलेला हा कार्यक्रम विचारप्रवर्तक व समाजाला दिशा देणारा ठरला.
कार्यक्रमास महिला-पुरुषांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, अहिल्या स्तवन व दीपप्रज्वलनाने झाली.प्रास्ताविक अकोला जिल्हाध्यक्ष व कार्यकारी अभियंता विनोद हंबर्डे यांनी करत संघटनेच्या पाच वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष सुधीर ढवळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे राज्याध्यक्ष अनिलकुमार ढोले यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थितीत नाना पांडे, प्रविण लांडे, प्रविण भागवत तर विशेष उपस्थितीत केशवराव पातोड, धिरज गादे, डॉ. राजेंद्र काटकर, प्रा. डॉ. अनिल तिरकर, मुकुंदराव भदे, मनोज पुंड व सचिव सचिन डाखोडे उपस्थित होते.
महिला आघाडीच्या वतीने आयोजित हळदी-कुंकू समारंभात सुमारे ४०० भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “या कार्यक्रमात केवळ समाजकारण दिसले” अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.सूत्रसंचालन सौ. जयश्री सुरोशे व आशाताई कात्रे यांनी केले. शंकर जोगी यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर आभारप्रदर्शन सौ. कांचन वसतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सचिन बंडगर, कैलास बचे व दिपक नागे यांनी विशेष परिश्रम घेतले..





