26.5 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ कंत्राटी कर्मचा-यांच्या समस्या सोडवण्याकरीता उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक लावणार – ऍड. युवराज धानोरकर

कंत्राटी कर्मचा-यांच्या समस्या सोडवण्याकरीता उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक लावणार – ऍड. युवराज धानोरकर

0
37

चंद्रपूर,दि.4 फरवरी- स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन या कार्यक्रमात जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्रात कार्यरत असलेले सर्व कंत्राटी व बाह्यस्त्रोत कर्मचारी यांचे पगार गेल्या पाच महिन्यापासून थांबवलेले असल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुढिल आठवड्यात बैठक लावण्याचे आश्वासन शिवसेना शिंदे गटाचे चंद्रपुर जिल्हाप्रमुख ऍड. युवराज धानोरकर यांनी धरणे आंदोलन स्थळी भेटी दरम्यान आश्वासित केले.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख युवराज धानोरकर यांनी आंदोलन स्थळी भेट देवुन , आंदोलन कर्त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या . राज्यभरात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात कंत्रांटी व बाह्यस्त्रोत कर्मचारी आहेत. त्यांना कुठल्याही सेवा सुविधा उपलब्ध नाहीत. भारतात महाराष्ट्र हा या कर्मच-यांमुळे नाव लौकिक करत आहे. त्यामुळे या कर्मचा-यांच्या समस्ये बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे बैठक लावुन, समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी धरणे आंदोलन स्थळी भेटी दरम्याण केले आहे.

यावेळी विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष शैलेश मुंजे, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेचे राज्याध्यक्ष शालिकरामजी माऊलीकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे उपाध्यक्ष रघुवीर अहिर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता मच्छीद्रनाथ धस यांनी या आंदोलनाला भेट देऊन कंत्राटी व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या .याबाबत शासन स्तरावर आम्ही फॉलोअप घेऊ. असेही यावेळी आश्वासन दिले. या धरणे आंदोलनाला जलजिवन मिशन व स्वच्छ भारत मिशनचे सर्व जिल्हास्तरावरील कंत्राटी कर्मचारी व तालुका पातळीवर कार्यरत डाटाएंट्री ऑपरेटर व अभियंता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank