गोंदिया, दि. 26 : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026” अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील पात्र सभासद शेतकऱ्यांना आज मोठा दिलासा मिळाला. सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था, कटंगी कला, ता. गोंदिया येथे जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या विशेष मेळाव्यात पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला गोंदिया जिल्ह्याचे खासदार राजेंद्र जैन,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक सुरेश टेटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपनिबंधक सहकारी संस्था योगेश भाकरे यांनी योजनांची संपूर्ण माहिती दिली. त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी संबंधित योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.मेळाव्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रक्रियेसाठी आधार प्रमाणीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास गती मिळणार असून, प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी सर्वश्री प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, पूजा अखिलेश सेठ, बाळकृष्ण पटले, बाबा पगरवार, सरला चिखलोंडे, मोहिनी वराडे, अखिलेश ठाकूर, अखिलेश सेठ, कीर्ती पटले, सदाशिव वाघाडे, गणेश लांजेवार, लिकेश चिखलोंडे, भाऊलाल रहांगडाले, मदन चिखलोंडे, रमेश गौतम, मंगल ठाकरे, केवल रहांगडाले, दिनेश तुरकर, सुनील पटले, शैलेश वासनिक सहित शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.





