26.9 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ धापेवाडा उपसा सिंचन योजनच्या सिंचनविषयक बाबींचा घेतला आ.रहांगडालेनी आढावा

धापेवाडा उपसा सिंचन योजनच्या सिंचनविषयक बाबींचा घेतला आ.रहांगडालेनी आढावा

0
42

तिरोडा,दि.०६-तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या प्रलबिंत कामाना घेत आमदार विजय रहागंडाले यांनी सिचंन भवन नागपूर येथे सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली.तसेच येत्या जुन पर्यंत सर्व कामे मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या.या बैठकीला कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, मुख्य अभीयंता गोसे खुर्द जयंत गवळी, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग श्री.चोपडे, अधीक्षक अभियंता संजय विश्वकर्मा,कार्यकारी अभियंता श्रीकांत मस्कावार उपस्थित होते.

धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-१ अंतर्गत सिंचन सुरु असुन तेथील पंप नादुरुस्त असल्यामुळे फ़क्त २ मिमी. पाण्याचा प्रवाह होतो.परिणामी शेतक-यांच्या शेतात पाणी पोहचत नाही यावर उपाययोजना करणे महत्वाचे असल्याचे आमदार रहागंडाले यांनी बैठकित महत्व पटवून दिले.बोदलकसा उजव्या कालव्याद्वारे १६ गावातील ४१६२ हे. क्षेत्रास सिंचन नियोजीत आहे.त्यापैकी ४०१६.३८ हे.सिंचन झालेले आहे.सोनोली व भोंबोडी गावांना सालेबर्डी लघुकालव्यावरुन सिंचन होत असुन सदर कालव्याच्या दुरुस्तीची कामे चालु असल्याने सदर गावांत पाणी पोहचू शकले नाही.सिंचन प्रापणसुची २०२५-२६ अंतर्गत सदर कालव्याची कामे प्रगतीपथावर असुन जुन २०२६ पर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अधिक्षक अभियंता यांनी सांगितले.

blank