महाप्रज्ञा बौद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती साजरी
तिरोडा : येथील महाप्रज्ञा बौद्ध विहार, रेल्वे चौकी तिरोडा येथे त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती ७ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विहाराचे नवीन प्रवेशद्वार व सुशोभिकरणाचे लोकार्पण तिरोडा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अशोक असाटी यांच्या हस्ते निळी फिट कापून करण्यात आले. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र बडगे आणि प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माजी आमदार दिलीप बन्सोड, माजी आमदार भजनदास वैद्य, नप गटनेते विजय बन्सोड, नप बांधकाम सभापती कदारभाई मन्सूरी, नप शिक्षण सभापती देवेंद्र तिवारी, नप महिला व बालकल्याण सभापती डॉ. कुमुद संदीप मेश्राम, प्रवेशद्वार दान दाते पवन वासनिक, नप सदस्य परमानंद पारधी, सौ. ममता आनंद बैस, सौ. ममता भोजराज धमेचा, सौ. मंगला नितीन तिरपुडे, सौ. आशाबाई श्यामराव भोंडेकर, सौ. रश्मी विनोद बुराडे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भुते आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थितीत होते.
या कार्यक्रमाची सुरुवात विहारातील त्यागमूर्ती माता रमाई, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला अभिवादन करत माल्याअर्पण व मेणबत्ती, अगरबत्ती लावून सामुहिक बुद्ध वंदना करण्यात आली.महाप्रज्ञा बौद्ध विहार समिती, तिरोडा च्या वतीने या कार्यक्रमाला उपस्थितीत नवनियुक्त नगराध्यक्ष यांनी दिलेल्या भरीव योगदाना बद्दल तसेच विषय समिती सभापती, आणि नगर परिषद सदस्य यांचे पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
या वेळी विहार समिती तर्फे प्रवेशद्वार दान दाते पवन वासनिक व अँड. सुप्रिया पवन वासनिक यांचे सह पत्निक तसेच राहुल बडगे आणि दीपा राहुल बडगे, जयकुमार बन्सोड यांचे धम्म दान केल्या बद्दल अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी विहारातील संबोधी कक्षात त्यागमूर्ती माता रमाई यांना अभिवादन करून त्यांच्या जीवनावर माजी आमदार भजनदास वैद्य, देवेंद्र तिवारी, डॉ. कुमुद मेश्राम, मंगला तिरपुडे, परमानंद पारधी आदी मान्यवरांनी प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विहार समितीचे कार्यकारी अध्यक्ष महेंद्र बडगे यांनी तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन संघटक पवन वासनिक, तर उपस्थितांचे आभार विहार समितीचे मार्गदर्शक सुरेश बन्सोड यांनी मानले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाप्रज्ञा बौद्ध विहार समितीचे सचिव प्रवीण चव्हाण, सहसचिव महेंद्र वालदे, कोषाध्यक्ष संजय जांभुळकर, मार्गदर्शक के. के. वैद्य कार्यकारणी सदस्य मनिंद्र बन्सोड, पवन वाघमारे, राहुल बडगे, लंकेश टेंभेकर, प्रवीण नंदागवळी, सत्यवान चौधरी, अँड. सागर चव्हाण, जयकुमार बन्सोड, देवानंद शहारे, सुजाता डोंगरे, स्मिता मेश्राम, सचिन पटले तसेच विहार परिसर अभ्यास केंद्रातील विध्यार्थी- विद्यार्थिनी आदींनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी महाप्रज्ञा बुद्ध विहार येथे मोठ्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका व समाज बांधाव उपस्थित होते.





