24.8 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ बोरटोला येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन; स्वच्छता व आरोग्यास चालना-लायकराम भेंडारकर

बोरटोला येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन; स्वच्छता व आरोग्यास चालना-लायकराम भेंडारकर

0
36

अर्जुनी-मोर.-बोरटोला येथे पावसाळ्यातील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा व नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात, या उद्देशाने नाली बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष लायकराम भेंडारकर म्हणाले की, “गावाच्या सर्वांगीण विकासात मूलभूत सुविधांना प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. नाली बांधकामामुळे पावसाचे पाणी योग्य प्रकारे वाहून जाईल, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होऊन नागरिकांचे आरोग्य चांगले राहील. स्वच्छ व सुंदर गाव हीच खरी प्रगतीची ओळख आहे.”
या नाली बांधकामामुळे परिसरातील पाणी साचण्याची समस्या दूर होणार असून पावसाळ्यात रस्ते व घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असून गावाच्या स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने हे काम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास पंचायत समितीचे उपसभापती संदीप कापगते, येथील सरपंच कुरुंदाताई वैद्य, पिंपळगावचे सरपंच विलास फुंडे, उपसरपंच काशिनाथ कापसे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण येरणे, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य गीताताई नारनवरे, ग्रामपंचायत सदस्य दीपंकर ऊके, प्रेमलाल नारनवरे, भारती डोये, सुरेखा ब्राह्मणकर, ग्रामविकास अधिकारी आर. पी. शहारे, अनिकेत डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही गावाच्या विकासासाठी अशा मूलभूत सुविधा महत्त्वाच्या असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांनीही या कामाबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने हे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. बोरटोला गावाच्या विकासात या नाली बांधकामामुळे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

blank