24.8 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ इर्री येथील प्राचीन शिव मंदिराला तीर्थक्षेत्र घोषित करून करणार कायापालट-आमदार अग्रवाल

इर्री येथील प्राचीन शिव मंदिराला तीर्थक्षेत्र घोषित करून करणार कायापालट-आमदार अग्रवाल

0
75

इर्री येथे ४ कोटी ७५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

गोंदिया,दि.०९- गोंदिया विधानसभा क्षेत्रातील नवरगावकला परिसरातील इर्री ग्रामात आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते व प्रयत्नांतून सुमारे ४ कोटी ७५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी इर्री पहाडावरील प्राचीन शिव मंदिर परिसराला भेट देत भगवान शिवाचे आशीर्वाद घेतले.

प्राचीन शिवमंदिराच्या शिव महाकालेश्वर ट्रस्ट समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांची भेट घेऊन मंदिर परिसरात सिमेंट रस्ता, परिसर सुशोभीकरण, गट्टू, किचन शेड, गणेश मंदिर सभामंडप, भक्तनिवास, चावडी इत्यादी कामांसाठी मागणीचे निवेदन सादर केले. आमदार अग्रवाल यांनी प्राचीन शिव मंदिर परिसराची पाहणी करून या परिसराच्या विकासासाठी कटिबद्धता दर्शवित जिल्हा नियोजन समितीमार्फत या ठिकाणास “क दर्जा”चे तीर्थक्षेत्र घोषित करण्यास सहमती दर्शविली.

आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, “मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाच्या बांधकामासाठी २५ लाख रुपये, इर्री ग्रामातील २५ लाख रुपये खर्चाचा सिमेंट रस्ता तसेच ४ कोटी २५ लाख रुपये खर्चाच्या इर्री–नवरगावकला–मुंडीपार रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. आगामी काळात इर्री ग्राम विकासाच्या पायरीवर अधिक उंचावावे, यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरु राहतील.”

या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार विनोद अग्रवाल, जि.प. सदस्य सौ. लक्ष्मीताई तरोने, इर्री सरपंच देवानंद गडपायले, उपसरपंच भाऊलाल तरोने, देवीलाल चौधरी, मगनलाल ढेकवार, राजाराम दमाहे, शोभेलाल नागपुरे, शहेशराम उपवंशी, योगराज मेंढे, भीमराज, देवराम मेंढे, बेसिराम फुलबांधे, अशोक मेंढे, संपत ब्राम्हणकर, गणेश पाथोडे, चेतराम नागपुरे, गुणेश मेंढे, भरतलाल चौधरी, हिरदीलाल चौधरी, बाबूलाल चौधरी, राजन ठकरेले, मोतीलाल नागपुरे, भोजराज मेंढे, साहेबलाल लिल्हारे, सखाराम मडावी, दिलीप ब्राम्हणकर, येलीभाऊ तरोने, उद्दल उपवंशी, चंद्रप्रकाश नागपुरे, ग्यानीराम उपवंशी, बंडू वरखडे, श्रीचंद वरखडे, किसन दमाहे, हरिचंद वरखडे, प्रांताताई ढेकवार, दीपलता उपवंशी, उर्मिलाबाई उपवंशी, धनवंता बाई वरखडे, साविता महारवाडे, किशनाबाई चौधरी तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.

blank