40.6 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home राजकीय संघटन बळकटीकरण करण्याचे आवाहन-जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे

संघटन बळकटीकरण करण्याचे आवाहन-जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे

0
38

blank

तिरोडा- तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सांस्कृतिक भवन सभागृहात उत्साहात पार पडली. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आणि त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या नेतृत्वगुणांची व पक्षनिष्ठेची आठवण
घेतली. पक्षाच्या संघटनात्मक पदांवर नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा महासचिव नासीर घाणीवा, तिरोडा शहराध्यक्ष विजय बुद्धे, तिरोडा तालुका अनुसूचित जमाती आघाडी अध्यक्ष संजय धुर्वे, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष प्रकाश पटले व महेश कुकडे, तिरोडा तालुका युवक महासचिव निरज गजभिये, तालुका महासचिव किशोर कुंभरे, महिला तालुकाध्यक्ष मंदा टेंभरे, महिला दिपलता ठकरेले, महिला जिल्हा महासचिव वैशाली तुरकर यांचा समावेश आहे. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष मेघा बिसेन, विधानसभा अध्यक्ष ओमप्रकाश रहांगडाले, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष युवराज शहारे, एम. डी. पटले, खेमराज पटले, भाग्यश्री केळवतकर, सरपंच रवींद्र भगत, विश्वनाथ बिसेन, संजय रहांगडाले, नरेश जांगडे, बालकदास कुंभरे यांच्यासह इतर उपस्थित कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

संघटनात्मक बांधणीवर भर
बैठकीत तालुक्यातील संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुका, पक्षाचे विविध सेल व आघाड्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना संघटन अधिक बळकट करण्याचे आणि गावपातळीवर पक्षाची पकड मजबूत करण्याचे आवाहन केले. यासह संघटनेच्या विविध पदांवर पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.