22.9 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home महाराष्ट्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

0
24

मुंबई,दि.२०: सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबरचा पगार 25 ऑक्टोबरपूर्वीच होणार आहे.दिवाळीच्या तोंडावर फडणवीस सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचं परिपत्रक सरकारकडून जारी करण्यात आलं आहे.29 ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. त्यामुळेच दिवाळी सण साजरा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा पगार लवकर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.