22.9 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home Top News फटाक्‍याच्या साठ्याला आग; 9 मृत्युमुखी

फटाक्‍याच्या साठ्याला आग; 9 मृत्युमुखी

0
22

शिवकाशी दि.२०- तमिळनाडूतील शिवकाशी येथे फटाका ठेवलेल्या गोदामातील फटाके एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविताना झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यु झाला आहे. या भीषण अपघातामुळे परिसरातील 20 वाहनांचे मोठे नुकसान झाले. तसेच एका रूग्णालयाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या अपघातात भास्कर, सोरनाकुमारी, देवी, कामराची, पुष्पलक्ष्मी, वल्लारमती, जानकीरमन, गणेशन आणि शंनमुगराज जखमी झाले आहेत. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर फटाक्‍यांच्या मोठे उत्पादन करणाऱ्या शिवकाशी येथे आग लागल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.