26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home शैक्षणिक तिगाव जिल्हा परिषद शाळेची गरुडझेप; एन.एम.एम.एस. परीक्षेत ११ विद्यार्थी उत्तीर्ण!

तिगाव जिल्हा परिषद शाळेची गरुडझेप; एन.एम.एम.एस. परीक्षेत ११ विद्यार्थी उत्तीर्ण!

0
178

आमगाव/तिगाव: – स्थानिक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, तिगावने आपल्या यशाची परंपरा कायम राखत एन.एम.एम.एस. (NMMS) परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेचे तब्बल ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी ९ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात शाळेचे कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या कष्टाला फळ व राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या अत्यंत चुरशीच्या परीक्षेत तिगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली. उत्तीर्ण ११ विद्यार्थ्यांपैकी ९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्ती मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहेत. या यशामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक प्रवासाला मोठी दिशा मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ.आर.वाय.रहांगडाले यांचे कुशल नेतृत्व आणि मार्गदर्शक लाभले.तसेच वर्गशिक्षक तुषार येटरे, रामेश्वर बागड़े,श्रिकांत कामड़ी, सौ.मडावी,सौ.शिवणकर,सौ.भोयर यांनी घेतलेली विशेष मेहनत आणि सर्व सहकारी शिक्षकांचे तांत्रिक व भावनिक पाठबळ यामुळेच हे यश शक्य झाल्याचे बोलले जात आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. पालकांनीही शाळेच्या या उपक्रमावर आणि शिक्षकांच्या समर्पित वृत्तीवर समाधान व्यक्त केले आहे. ही कामगिरी भविष्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
“आमच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात असूनही मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. मुख्याध्यापिका, शिक्षक आणि पालकांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे फळ आहे.” -डॉ कुंजनकुमार तुरकर सरपंच ग्राम पंचायत तिगाव.

blank