23.3 C
Gondiā
Thursday, July 23, 2026
Home शैक्षणिक आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळा शिवनी येथे पर्यावरण जनजागृती अभियानांतर्गत वृक्षारोपण

आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळा शिवनी येथे पर्यावरण जनजागृती अभियानांतर्गत वृक्षारोपण

0
14

आमगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने तालुक्यातील आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळा, शिवनी येथे पर्यावरण जनजागृती अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करून वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक व आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व समजावून सांगण्यात आले. “एक विद्यार्थी – एक वृक्ष” या संकल्पनेचा स्वीकार करून लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. परिसर अधिक हिरवागार व प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अनिल अंबुले, शिक्षक कृष्णकुमार देशमुख, शालिक यटरे, सुरेश मुधोळकर, अनिता मानकर, केमीला चांदेवार, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेत वृक्षसंवर्धनासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वृक्षारोपण उपक्रमाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.

blank