38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता ईटियाडोह धरणाच्या कालव्यात आढळला २३ वर्षीय युवकाचा मृतदेह

ईटियाडोह धरणाच्या कालव्यात आढळला २३ वर्षीय युवकाचा मृतदेह

0
86

blank

अर्जुनी-मोर.,दि.०६-तालुक्यातील बोंडगांवदेवी येथील 23 वर्षीय युवकाचा मृतदेह तिबेटियन कॅप जवळील ईटियाडोह धरणाच्या कालव्यात 5 मार्चच्या सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.आशिष जितेंद्र मेश्राम वय 23 रा.बोंडगावदेवी असे मृतदेह सापडलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत मृतकाचे वडिलाने माझ्या मुलाचा घातपात झाल्याचे लेखी निवेदन अर्जुनी-मोर. व केशोरी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना दिले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बोंडगांवदेवी येथील आशिष जितेंद्र मेश्राम हा तरुण धुलीवंदनाचे दिवसी आपल्या मित्रांसोबत मौज मस्ती करीत होता. मंगळवार 3 मार्चच्या सायंकाळ पर्यंत आशिष हा गावातच होता.असे बोलल्या जाते.मात्र तो रात्र झाल्यानंतर घरी न येता अचानक गायब झाला.त्यामुळे घरच्या लोकांनी सर्वत्र शोध घेतला.दुस-या दिवशीही नातेवाईकांकडेही शोध घेण्यात आला.मात्र कुठेही थांगपत्ता न लागल्याने मृतकाचे वडील जितेंद्र मेश्राम यांनी 5 फेब्रुवारीला अर्जुनी-मोर. पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. यानंतर लगेच त्याच दिवसी गोठणगाव प्रतापगड कडुन येणा-या ईटियाडोह कालव्यातून एक मृतदेह वाहत येत असल्याची माहीती केशोरी पोलीस स्टेशनला कळताच ठाणेदार मंगेश काळे आपल्या ताफ्यासह चिचोली तिबीटियन कॅप परीसरात दाखल झाले.व तिबेटकॅप जवळ प्रेत अडवून ताब्यात घेतले.मृतकाचे हातावर आशिष नाव लिहुन असल्याने व त्याच दिवसी अर्जुनी-मोर. पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल असल्याने हाच आशिष मेश्राम आहे.अशी माहीती झाल्याने व मृतकाचे कुंटुबियानाही ओळख पटल्याने पोलीसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी अर्जुनी-मोर. ग्रामीण रुग्णालयात पाठविले.दुस-या दिवसी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले.मात्र यावेळी मृतकाचे कुटुंबिय व नातेवाईकांनी घातापाताचा संशय व्यक्त करीत माझ्या मुलाचा खुनच झाला.त्यामुळे संशयीत आरोपींना पहिले अटक करा.तरच अंत्यसंस्कार करु अशी भुमिका घेतल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.ग्रामीण रुग्णालयात अर्जुनी-मोर. चे ठाणेदार कमलेश सोनटक्के व केशोरीचे ठाणेदार मंगेश काळे आपल्या ताफ्यासह हजर होते.यावेळी दोन्ही ठाणेदारांनी निष्पक्ष चौकशी करुन कोणत्याही आरोपींची गय केली जाणार नाही अशी ग्वाही दिल्याने मृतदेह अंत्यसंस्कारासाठी बोंडगावदेवीला नेण्यात आले.

blank