34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी होणार मुलींचे ‘एचपीव्ही’ लसीकरण !

कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी होणार मुलींचे ‘एचपीव्ही’ लसीकरण !

0
37

blank

गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ नये म्हणून लसीकरण आवश्यक
बाळगता पालकांनी पुढाकार घ्यावा.यामुळे मुलींचे आरोग्यविषयक भविष्य सुरक्षित होवु शकते- प्रजित नायर
गोंदिया (दि.6 मार्च)- :  ‘एचपीव्ही’ लसीकरण बाबतची जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख अध्यक्षतेत संपन्न झाली.गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला दूर करण्यासाठी ज्या मुलींचे 14 वर्ष पुर्ण झाले आहे परंतु 15 वर्ष पुर्ण होण्यास आहे म्हणजेच 14 ते 15 वर्ष वयोगटातील असे मुलींचे एचपीव्ही लसीकरण होणार असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी यावेळी दिली.लसीकरण केल्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचा धोका टाळता येणार आहे. जिल्हास्तरीय ‘एचपीव्ही’ लसीकरण बाबतचे सादरीकरण जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी केले.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटल्याप्रमाणे, 2030 पर्यंत एचपीव्हीचे लसीकरण पूर्ण करून येत्या शतकात गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा आजार नियंत्रित करण्याचे उद्दिष्ट आहे.त्यानुसार ग्रामीण व शहरी भागात एचपीव्ही लसीकरण दिल्यानंतर गर्भाशयाच्या मुखाच्या कॅसरला नियंत्रणात आणु शकतो.
‘एचपीव्ही’ लसीकरण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंधासाठी अत्यंत प्रभावी व सुरक्षित आहे.14 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलींनी लसीकरण केल्यास भविष्यात संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.लसीकरणाबाबत भीती न बाळगता पालकांनी पुढाकार घ्यावा.यामुळे मुलींचे आरोग्यविषयक भविष्य सुरक्षित होवु शकत असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी गोंदियावासियांना केले आहे.सर्व विभागांनी एकत्रित सहकार्याने ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवावी.ग्रामीण व शहरीभागात ‘एचपीव्ही’ लसीकरणाविषयी जनजागृती करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी आरोग्य विभागाला दिले.

जिल्हास्तरीय समिती सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पवन राऊत,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल यांचेसह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांचेसह शिक्षण,महिला व बाल विकास,आदिवासी एकात्मिक योजना प्रकल्प,आयएमए विभागाचे प्रतिनिधि,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय व के.टि.एस, सामान्य रुग्णालयाचे बालरोग व स्त्री रोग तज्ञ तसेच शासकीय कार्यालयाचे व अशासकिय संस्थेचे अधिकारी उपस्थित होते.

काय आहे एचपीव्ही-
• एचपीव्ही लसीकरण घेतल्यानंतर गर्भाशयाच्या मुखाचा कॅसरला नियंत्रणात आणु शकतो.
• लस योग्य वयोगटात घेणे आवश्यक आहे. लाखो महिलांचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे होतो.
• एचपीव्ही (HPV) लसीकरण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासह (Cervical Cancer) अनेक प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे लसीकरण मुख्यत्वे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा (HPV) प्रसार रोखते.
14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींचे होणार लसीकरण-
ज्या मुलींचे 14 वर्ष पुर्ण झाले आहे परंतु 15 वर्ष पुर्ण होण्यास आहे म्हणजेच 14 ते 15 वर्ष वयोगटातील असे मुलींचे एचपीव्ही लसीकरण होणार आहे.यामुळे झाल्यामुळे गर्भाशयाचे मुखाचा कॅंसर मृत्युचे प्रमाण कमी होणार आहे.
गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरकडे दुर्लक्ष नको….
• गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर झाल्यामुळे लाखो महिलांचा मृत्यू झाला आहे.शासनाने ही समस्या कायमची दूर करण्यासाठी गंभीर दखल घेतली असून, एचपीव्ही लसीकरणाचा उपाय हा आजार होऊ नये यासाठी अवलंबिला जाणार आहे.

एचपीव्ही लसीकरण महत्वाचे-
• गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध – भारतात महिलांमध्ये आढळणारा हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे, ज्यामुळे दरवर्षी हजारो महिलांचा मृत्यू होतो. एचपीव्ही लस या कर्करोगाचा धोका कमी करू शकते.
• लसीकरणाची सर्वोत्तम वेळ – वयाच्या 9 ते 14 वर्षांच्या दरम्यान ही लस घेणे सर्वाधिक प्रभावी मानले जाते, कारण लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यापूर्वी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.
• केंद्र शासनामार्फत मुलींसाठी मोफत मोहीम- भारत सरकारद्वारे 14 ते 15 वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी विशेष मोफत लसीकरण मोहीम (Gardasil-4) राबवली जात आहे, जी एकाच डोसद्वारे दीर्घकाळ संरक्षण देते.
• लैंगिक संसर्गापासून बचाव – एचपीव्ही हा लैंगिक संबंधातून किंवा त्वचेच्या स्पर्शातून सहज पसरतो. लसीकरण या संसर्गाची साखळी तोडण्यास मदत करते.

blank