■ महाप्रसादाचे वितरण
देवरी,दि.०७: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी (ता.६ मार्च) देवरी येथे विरांगणा राणी दुर्गावती चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी (उबाठा)शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शैलेश जायस्वाल हे होते. याप्रसंगी देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा,देवरी शहर प्रमुख राजा भाटिया, उप तालुका प्रमुख- राजू पटले, सुहाग गिरी, गोंविद बंसोड, धर्मेन्द्र जगनिक, डालचंद मडावी, डॉ.भुमेश पटले, विभाग प्रमुख-लोकनाथ लांजेवार, प्रशांत यादव, शाखा प्रमुख- हेमराज बावनकुडे, मनोहर मेश्राम, रमेश आचले, लल्लुप्रसाद उपाध्याय, राजु क्षिरसागर, मुलचंद मोहबे, यश गिरी, अजय गिरी, दिनेश डुंभरे, बादल टेंभुनीया, घनश्याम बावने यांच्यासह देवरी तालुक्यातील शिवसैनिक युवासैनिक, महिला संघटना, किसान सैनिक व तसेच समस्त संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
या जयंती सोहळ्याचे संचालन व प्रास्ताविकातून तालुकाप्रमुख सुनील मिश्रा यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा केला जातो, असे म्हटले. तर उपस्थितांचे आभार शहरप्रमुख राजा भाटिया यांनी मानले.
या जयंती कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवरायांची मूर्तीपुजन आणि गोंड महाराणी दुर्गावती यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून जय घोषाने करण्यात आली. दरम्यान, एक हजारावर उपस्थित शिवसैनिक व नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.





