24.8 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home मराठवाडा/खान्देश महिला दिनी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा आरोग्यदायी उपक्रम

महिला दिनी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा आरोग्यदायी उपक्रम

0
31
परभणीत स्तन कर्करोग तपासणी शिबीर संपन्न
‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ
१२४ महिलांची तपासणी
परभणी, दि.9- जागतिक महिला दिना निमित्य आज स्त्री रुग्णालयात महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग तपासणी शिबीर आणि गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंध करणाऱ्या ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेचा शुभांरभ पार पडला.
आरोग्य राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झालेल्या या शिबिरात सुमारे १२४ महिलांची तपासणी करण्यात आली.
बीएनपी वेलनेस, दिल्ली एज्युकेशन ट्रस्ट व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने “लवकर निदान, उत्तम संरक्षण” या संकल्पनेवर आधारीत स्तन कर्करोगाविषयी जनजागृती व लवकर निदान करणे ह्या उद्देशाने जिल्ह्यातील शासकीय महिला अधिकारी, कर्मचारी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी आयोजित या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे, पालकमंत्री यांचे शासकीय स्वीय सहाय्यक अनिकेत पालेपवाड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, कर्करोग विशेष तज्ञ डॉ. मनोज मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेंद्र वर्मा, स्त्रीरोग तज्ञ डॉ. जयश्री यादव, मुख्य प्रशासकीय अधिकारी आर. एस. शिरसेवाड, बीएनपी. वेलनेसचे डॉ. जागृती नंदा, कपिल देशपांडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
श्रीमती संगेवार यांनी महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती वाढविणे अत्यंत गरजेचे असून कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात, त्यामुळे महिलांसाठी अशा प्रकारची जनजागृतीपर शिबिरे व आरोग्यविषयक कार्यक्रम नियमितपणे आयोजित करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
डॉ. लखमावार म्हणाले की, महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती वाढविण्यासाठी दर महिन्याला एक आरोग्य शिबिर घेण्यात येईल. तसेच परभणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशी शिबिरे नियमितपणे आयोजित करून ही सेवा सुरळीतपणे सुरू ठेवण्यात येईल.
डॉ. सारिका बडे यांनी उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी स्वतःच्या आरोग्याची नियमित काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. अशक्तपणा, रक्ताची कमतरता तसेच मानसिक ताणतणावाशी संबंधित आजार हे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळे वेळेवर तपासणी करणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या मोफत तपासणी व उपचार सुविधांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी स्त्री रुग्णालयातील सर्व स्त्री रोग तज्ञ, महिला अधिकारी, कर्मचारी तसेच शांतीप्रकल्प संघातील स्त्रियांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रस्तावना अधिसेविका चंदाराणी लेमाडे यांनी तर आभार अधिपरिचारिका शीतल शिंदे यांनी मानले.
***

blank