ओदिशा, दि. २४ – ओदिशातील मलकनगरी येथे सुरक्षा दलातील जवानांशी झालेल्या चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाले आहेत. ओदिशा व आंध्र प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान या चकमकीत दोन पोलिसही जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.




