हिंगणघाट:- नारी शक्तीच्या कार्याला, संघर्षाला स्मरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगणघाट आगारामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम शेंडे आगार व्यवस्थापक हिंगणघाट हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून ॲड. सौ अस्मिता मुंगल, सौ रत्नमाला धाबर्डे माजी नगरसेविका न. प. हिंगणघाट ह्या सामाजिक क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती ममता सोनोने वाहतूक निरीक्षक, नितीन भगत प्रभारक, गणेश वाघमारे आगार लेखाकार हे मंचावर उपस्थित होते.
यावेळी दीपप्रज्वलन करून सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ॲड अस्मिता मुंगल यांनी महिलांना कामकाजाच्या ठिकाणी समस्या, घरगुती व कार्यालयीन ठिकाणी होणारे अत्याचार, त्यांना सामोरे जातांना महिलांनी अबला बनवून न राहता कणखर बनून काम करावे, असे आवाहन केले. सौ रत्नमाला धाबर्डे यांनी आपल्या भाषणात जागतिक महिला दिन साजरा करण्याचे दिनाबाबत इतिहास सांगून, महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसून महिलांना घर आणि कामात सांगड घालून काम करण्याचा सल्ला दिला. यावेळी गौतम शेंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात 8 मार्च या जागतिक महिला दिनाबाबत इतिहास, महिलांचा विविध क्षेत्रातील सहभाग, पश्चिमात्य देशाच्या तुलनेत स्वातंत्र्यानंतर थोर महापुरुषांमुळे सतीप्रथा, बालविवाह प्रतिबंध, शिक्षणाचा अधिकार, तसेच भारतीय राज्यघटनेमुळे महिला मिळालेले विविध अधिकार, संरक्षण, महिलांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग, विविध क्षेत्रातील कर्तृत्व यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला आगारातील उपस्थित सर्व महिला प्रशासकीय कर्मचारी बबिता मून, विद्या आवळे, बबिता दमके, स्मिता कांबळे, करिष्मा निखार, मीनाक्षी टेंभुर्णे, पूनम कुकडे, प्रतिभा ठाकरे, यांत्रिक कर्मचारी उज्ज्वला बहादुरे, सोनू भलावी, कल्पना वाढणकर, मनिषा मोहरे, वाहक अर्चना मुंगसे, अर्चना बनकर, सुवर्णा साठोणे, पूजा गायकवाड, सुनीता साल्पेकर, कांताबाई वरखडे, ममता बैस, रंजना नखे, ममता सोनोने ई . महिला कर्मचाऱ्यांचा मान्यवरांकडून गुलाबपुष्प, पुष्पगुच्च देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता कांबळे यांनी, सूत्रसंचालन मीनाक्षी टेंभुर्णे यांनी तर आभार प्रदर्शन पूनम कुकडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र डंभारे, सय्यद आसिफ अली शेरू, हितेंद्र हेमके, देवानंद जोगे, अमित मेश्राम, श्रीकांत काशिद यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला आगारातील प्रशासकीय महिला कर्मचारी, महिला यांत्रिक कर्मचारी, महिला वाहक तसेच इतर प्रशासकीय कर्मचारी,यांत्रिक कर्मचारी, चालक वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





