23.2 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home Top News आंध्र-ओडिशा सीमेवर चकमकीत 21 नक्षलवादी ठार

आंध्र-ओडिशा सीमेवर चकमकीत 21 नक्षलवादी ठार

0
25
भुवनेश्वर : आंध्र प्रदेश-ओडिशा सीमेवर मल्कानगिरी जिल्ह्यातील जंगलात आज (सोमवार) पहाटे आंध्र प्रदेश व ओडिशा पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 21 नक्षलवाद्यांना ठार झाले आहेत.
 
पोलिस अधीक्षक राहुलदेव शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील मल्कानगरी जिल्ह्यातील जंत्री जंगलात आज पहाटे पोलिसांना नक्षलवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मल्कानगिरी जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई होती. या कारवाईत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.