23.2 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home मराठवाडा/खान्देश टाटा बोर्डने सायरस मिस्त्री यांना हटवले

टाटा बोर्डने सायरस मिस्त्री यांना हटवले

0
24

नवी दिल्ली ,दि. 24 –: टाटा सन्सचे चेअरमन सायरस मिस्त्री यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. ग्रुपने रतन टाटा यांना पुढील चार महिन्यांसाठी तात्पुरते चेअरमन पदावर नियुक्त केले आहे. पुढील चेअरमन पदासाठी एक सर्च पॅनल नियुक्त करण्यात आला आहे. 28 डिसेंबर, 2012 मध्‍ये टाटा सन्सची जबाबदारी रतन टाटा यांनी सायरस मिस्‍त्री यांच्‍याकडे दिली होती.
ही टीम सर्च करेल नवीन चेअरमन –
– सर्च कमिटीमध्ये रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन आणि कुमार भट्टाचार्या यांचा समावेश आहे. वेणू श्रीनिवासन टीव्हीएस मोटरचे चेअरमन आहेत.
रोनेन सेन टाटा सन्सचे इंडिपेंडेंट डायरेक्टर आहेत. अमित चंद्रा टाटा सन्सचे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्‍टर आणि बेन कॅॅपिटलचे एमडी आहेत. कुमार भट्टाचार्या वार्विक मॅॅन्‍यूफॅॅक्‍चरिंग ग्रुपचे चेअरमन आणि टाटा सन्सचे इंडिपिडेंट डायरेक्‍टर आहेत.