नागपूर…विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुका पार पडल्या असून आज अध्यक्षपदाच्या मतमोजणीचे निकाल जाहीर झाले आहे. त्यानुसार विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून श्री गिरीश गांधी निर्वाचित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. गिरीश गांधी यांना एकूण 2261 मते पडलीत. उर्वरित 22 कार्यकारणी सदस्य पदाचे निकाल उद्या रात्रीपर्यंत लागण्याची शक्यता आहे. त्यांचे फक्त 600 मत मोजून झाले आहेत.
आज मतमोजणीला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ झाला. अध्यक्षपदासाठी उभे असलेले पाच उमेदवाराना मिळालेली मते खालील प्रमाणे.
श्री गिरीश गांधी यांना एकूण 2661 तर श्री प्रदीप दाते यांना 1187 तसेच डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना 701 तर डॉ. रवींद्र शोभने यांना 205 आणि श्री. रंजन दारव्हेकर यांना 114 मते पडली. एकूण 63 मतं अवैध ठरली आहेत. या निवडणुकीसाठी 4935 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. श्री गिरीश गांधी हे एकूण 1474 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी श्री पारखी यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सदर मतमोजणी सुरू आहे. संपूर्ण मतमोजणी आणि उर्वरित सदस्यांचे निकाल उद्या रात्रीपर्यंत लागण्याची शक्यता आहे.





