25.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन

वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन

0
2

चित्रा कापसे/तिरोडा-महाराष्ट्र वन विभागाच्या कार्यालयात वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध स्थानिक वनविषयक प्रश्न व नागरिकांच्या मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले.यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसोबत परिसरातील वनक्षेत्र, वन्यजीवांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या तसेच नागरिकांच्या विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वनविभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. अधिकाऱ्यांनी संबंधित मागण्यांची दखल घेऊन नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.छायाचित्रात वनविभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना निवेदन देताना शिष्टमंडळातील सदस्य दिसत आहेत.

blank