24.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी जिल्ह्याचे दौऱ्यावर

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी जिल्ह्याचे दौऱ्यावर

0
119

गोंदिया, दि.17 : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवारी 20 मार्च 2026 रोजी जिल्ह्याचे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 10.30 वाजता हेलिकॉप्टरने नागपूर विमानतळ येथून गोंदिया येथील कुडवा हेलिपॅडकडे प्रस्थान. सकाळी 11.20 वाजता मनोहर पटेल इन्स्टिट्युट ऑफ इंजिनियरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी (एमआयटी), कुडवा हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रस्थान. सकाळी 11.30 वाजता टी.बी. टोली ग्राऊंड, कुडवा येथे छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत तालुकास्तरीय समाधान शिबीर कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.20 वाजता मोटारीने कुडवा येथील हेलिपॅडकडे प्रस्थान. दुपारी 1.30 वाजता कुडवा हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने नागपूर विमानतळाकडे प्रस्थान करतील.

blank