
गोंदिया,दि.१८- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल दोन दिवसीय दौऱ्यावर नागपूर व गोंदिया जिल्ह्यात येत असून दिनांक १९ व २० मार्च २०२६ ला अनुक्रमे नागपूर व गोंदिया येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दिनांक १९ मार्च, गुरुवारला सायंकाळी ६.०० वाजता हॉस्पिटल भूमिपूजन कार्यक्रम, रामदासपेठ, पंचशील चौक, नागपूर येथील कार्यक्रमांला उपस्थित राहणार आहेत. दिनांक २० मार्च, शुक्रवारला सकाळी १०.३० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुका स्तरीय समाधान शिबीराचे कार्यक्रमाला टी. बी. टोली ग्राउंड, गोंदिया येथे तसेच दुपारी १२.३० वाजता कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या भेटी व चर्चा निवासस्थान, रामनगर, गोंदिया येथे उपस्थित राहणार असून पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत. तरी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने वरील कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केले आहे.





