25.1 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home गुन्हेवार्ता बोरटोला/भरनोली येथे घराला आग;70 हजारांचे नुकसान

बोरटोला/भरनोली येथे घराला आग;70 हजारांचे नुकसान

0
39

गोंदिया – गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बोरटोला/भरनोली येथे आज सकाळी सुमारे 9 वाजताच्या दरम्यान एका घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार राजाराम मंगलू नैताम रा. बोरटोला/भरनोली हे कुटुंबासह सकाळी मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेले असताना त्यांच्या घरात कोणीही नसताना आग लागली.आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किट किंवा इतर कारणाची शक्यता वर्तवली जात आहे.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.मात्र आगीत घरातील मागील दोन खोल्या जळून खाक झाल्या.यात धान्यसाठा, तांदूळ,भांडी,कपडे, खिडक्या-दरवाजे,झोपण्याचे पलंग,लाकडी छत व इतर साहित्य पूर्णतः जळाले.या आगीत अंदाजे 60 ते 70 हजारांचे नुकसान झाल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी नावेद शरीक शेख यांनी दिली आहे.दरम्यान प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.