24.2 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ सहाय्यक निबंधक वाहने यांचा सेवानिवृत्ती सत्कार

सहाय्यक निबंधक वाहने यांचा सेवानिवृत्ती सत्कार

0
170

गोंदिया- गोरेगाव तालुक्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहाय्यक निबंधक अजय वाहने यांचा 30 मार्च रोजी सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे मुख्य लिपिक पंजाब चव्हाण, विलास गणवीर, शालिनी मांढरे, अण्णाभाऊ साठे पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल मदनकर, व्यवस्थापक सुभाष खोब्रागडे प्रमुख रूपाने उपस्थित होते. सहाय्यक निबंधक वाहने यांनी गोरेगावचे सहाय्यक निबंधक पद उत्तमरीत्या राबविले. त्याचप्रमाणे त्यांनी जिल्हा निबंधक कार्यालयात सुद्धा आपली सेवा दिली. यावेळी कार्यालयीन कर्मचाऱ्यामार्फत सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजित कार्यक्रमात वाहने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वाहने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

blank